हनुमान जयंती
हनुमान जयंती
करी उड्डाण
ये पृथ्वीवरी
दुष्ट दुर्जना
शासन करी ...
सामान्य जन
हैराण झाले
..............
किती माजले !!
जगणे सारे
कठीण झाले
जन सामान्यां
नैराश्य आले ...
अमर तू रे
तुच रे त्राता
प्रगट हो रे
तू हनुमंता ...
हतबलता
काया भरली
तुजपाशी मी
धाव घेतली ...