हिरव्या रानात
हिरव्या रानात
हिरवाईच्या गर्द रानात
वाहतो पहा थंड वारा
अंगाला स्पर्श होताच
मनी बहरला शहारा
सुख देतो, दुःख लांब ठेवतो
नवचैतन्याने पसरतो अफाट
साऱ्या विश्वाला भुलवूनी देतो
जागवुनी नव्या आशेची पहाट
देतो साऱ्या सृष्टीला आनंद
आगमनाच्या गार चाहुलीने
नव्या दिवसाची सुरुवात करी
मनी सुगंध स्पर्शाच्या भावनेने
शांततेत आगमन होई रानात
फुलवून जगाची नवी आशा
त्याच्या येण्याने सर्व जगाची
पहा जाई जीवनातून निराशा
पाखरांचे थवे उडती आकाशी
निळेभोर आकाश त्यांचा सोबती
सर्वांना वाटे तो कायम हवाहवासा
चल करू आज हिरव्या रानाशी दोस्ती
