हिरवळ
हिरवळ
झाला बेचेन जीव माझा
हिरवळ भूवर कुठे दिसेना
जीव तरसलाय हा आता
वसुंधरा हरितसुंदर भासेना
नित्य करूनी वृक्षारोपण
उगवावी धरेवर हिरवळ
पाणी माती पकडेल घट्ट
जरी आली मोठी वावटळ
झाडे आणतील पर्जन्य
सुखावेल ही सजीवसृष्टी
वसुंधरा सुजलाम होऊन
जलधारांची होईल वृष्टी
ध्यास धरावा मनाशी निरंतर
लावुन झाडे करूया वृक्षसंवर्धन
सिमेंट-काँक्रिटच्या अशा जंगलाने
नष्ट झालेत अरण्य आणि वन
निराश्रित मुक्या वन्य पशूंना
आश्रय हवा सुरक्षित रहायला
पक्षीपाखरांना इथे झाडांवरती
घरटी बांधुन किलबिलायला
करावे रक्षण या निसर्गाचे
ध्यानी घेऊन एकच मंत्र
होईल भले आपणा सर्वांचे
वृक्षारोपणाचे वापरू तंत्र
