हिंदवी स्वराज्य संस्थापक
हिंदवी स्वराज्य संस्थापक
मराठा सरदार भोसल्यांचा
केली सुनबाई जाधवांची
झाला जन्म थोर शिवबाचा
गाजवी पराक्रम शौर्यांची . /१/
जिजामातेच्या शिकवणीतून
घडे शिवबाची शौर्यता
पाहे स्वराज्य स्वप्नातुन
सत्य करून दाखवे वीरता. /२/
घेऊनी शिक्षण कलेचे
चालवी तलवार दंडपट्टा
जिद्द न सोडी शिकण्याचे
गाजवे मोहिमेचा कट्टा. /३/
इच्छा ऐकुणी जिजाईंची
ना करेन चाकरी दुसऱ्यांची
स्थापिन स्वतःचे स्वराज्य
घेऊन साथ मावळ्यांची. /४/
सुरु झाली कारकीर्द
बनुनी प्रेरणा जिजाई
सहकारी सारे मराठा मर्द
विजय पाहुनी धन्य होई. /५/
शपथ घेतली स्वराज्याची
बोलूनी गुपित मनातले
रायरेश्वर मंदिर गुंजले
वीर दहाडले राज्यातले. /६/
मावळे झाले भक्त शिवबाचे
वाढवी उत्साह हजारपटीने
वतनदार दौडवीले देशाचे
खरे करण्यास स्वप्न वेगाने. /७/
शाही शिक्क्याने पाया रोवला
स्वराज्य लोकांसाठी स्थापला
चढुनि झुंजार माची चा तोरणा
विजयाचा पताका गडावर दुमदुमला. /८/
जोपासुनी स्वराज्य मुल्ये
वाढवी मराठा वारसा
दिसे प्रशासकीय कौशल्ये
छत्रछायेचा हा दिलासा. /९/
मुरुंबदेव बनला राजगड
पहिली स्वराज्य राजधानी
जिंकूनी पाठोपाठ बरेच गड
सांभाळे गरिबांची आणीबाणी. /१०/
फज्जा पाडे अंतर्गत दुश्मनांचे
करेल घात तर मिळेल मात
हिंदवी स्वराज्य आहे हक्काचे
वाढवूया देऊनी एकमेका हात. /११/
धूर्त खानाला धुळीस चारून
कठीण डाव हाणून पाडे
वागुनी चातुर्याने केले हरण
विजयी कारकीर्द पसरे चोहीकडे. /१२/
काबीज करून गड पन्हाळा
सिद्दी जोहरला मात देऊनी,
शिवा काशीदचा गाजे जिव्हाळा
निसटून काढला मार्ग वेढ्यातूनी. /१३/
बाजीने लढवली खिंड
वाचवून स्वराज्याचा कर्ता
घोडखिंड बने पावनखिंड
उद्ग़ारी समंजस राज्यकर्ता. /१४/
घुसूनी लाल महालात
काल दाखवी खानास
उडवुनी बोटे भेटीत
धमक दाखवी मुघलास. /१५/
लढला मुरारबाजी पुरंदरासाठी
कठोर निर्णय झाला स्वराज्यतुनी
करून तह पुरंदरचा
मान ठेवला महाराजांनी. /१६/
औरंगजेबास शिकवूनी धडा
सोडूनि आग्रा थोर शिवाजी.
सुलतान झाला हडबडा
पाहुनी शुरविराची बाजी. /१७/
तानाजी बळकावी कोंढाणा
लावूनी लग्न गडाचे मग रायबा
गड आला पण सिंह गेला
कळवून बोले थोर शिवबा. /१८/
नटले सिंहासन सोन्याने
पारणे फिटे डोळ्यांचे
सप्त नद्यांच्या अभिषेकाने
पाहुनी राज्याभिषेक सोहळ्याचे./१९/
पुरोगामी समंजस राज्यकर्ता
मोहिमा आखुनी बळकावी किल्ला
नौदलाचा जनक, धर्मनिरपेक्ष विघ्नहर्ता
धडकावे चातुर्याने परकीयांचा हल्ला. /२०/
वाढविली दक्षिणेत शिवसृष्टी
स्थापूनी अष्ट मंत्र्यांची सरकार
ठेवूनी प्रजा कल्याण दूरदृष्टी
आखला व्यवस्थापनेचा कारभार. /२१/
परस्त्रीस मानुनी माता
रोखी हिंसाचार अन्यायी छळ
हिरकणीची जाणूनी वीरता
स्त्रीस देई रक्षणाचे बळ./२२/
वसुनी जनाजना च्या हृदयात
सोडूनी आम्हास गेला
कधी ही न वीसरे विश्वात
झेंडा अटकेपार फडकवला. /२३/
आजही देई मानेचा मुजरा
धन्य ती राजाची जनता.
जी ने घडविला महान शिवबा
धन्य धन्य ती वीर माता. /२४/
असा हा हिंदवी संस्थापक
जिवंत अजूनही मनामनात
कीर्ती अशीच वाढवू अजरामर
गाऊनी गुणगौरव शिवजयंतीत./२५/
