हिमा दास
हिमा दास
मोडून सारे विक्रम
नवा अध्याय लिहला ;
भारती हिमाचा इतिहास
सुवर्णाक्षरांनी कोरला.
आसामात जन्मली ती
गरीब शेतकऱ्या पोटी ;
पाच सुवर्णपदके जिंकली
आपल्या भारतासाठी.
अहोरात्र मेहनतीने केले
तिने आपले स्वप्न साकार ;
बक्षीसनिधीतून उचलला
आसामी पुरग्रस्तांचा भार.
तिच्या अविरत संघर्षापुढे
हिमालयही झाला नतमस्तक;
" हिमा दास " सुवर्णकन्येची
सातासमुद्रापार दस्तक.
तिच्या जिद्द- चिकाटीला
आमचे त्रिवार वंदन ;
उमलू द्या हो कळ्यांना
आर्त साद घाली "चंदन".
गावोगावी-घरोघरी जन्मावी
आता गुणवान हिमा दास;
"मुलगा- मुलगी एकसमान"
लेकजन्माचे स्वागत करू खास.