ही वाट एकट्याची....
ही वाट एकट्याची....
ही वाट एकट्याची, लढतच राहिल,
पंखात बळ सारखं, मी भरतच राहिल...
ही वाट एकट्याची, अवघड नाही माझ्यासाठी,
करेन हाैसला बुलंद, सकारात्मक जगण्यासाठी...
ही वाट एकट्याची, लढला खिंडीत तानाजी,
संगतीला नाही पाहिले, पवाॆ केली नाही जीवाची...
ही वाट एकट्याची, मग खचून का जावं,
मागचं अपयश धुवून, पुढे पुढे चालतच राहावं...
