STORYMIRROR

Nandini Menjoge

Romance Tragedy Others

4  

Nandini Menjoge

Romance Tragedy Others

ही रात्र बोचते मला

ही रात्र बोचते मला

1 min
328

मऊ अंथरुण स्वप्नांची वाट पाहताना... 

भ्रम काट्यांची थाप दारी पडताना.... 

ही रात्र बोचते मला ||


तृप्त सुरांची अंगाई स्तब्ध होत असताना... 

प्रश्नावलींनी वेळ मंत्रमुग्ध होत असतांना...

ही रात्र बोचते मला ||


चिकार काळोखाचे साम्राज्य फुलताना... 

निश्चिन्त श्वासाची कोंडी होत असताना... 

ही रात्र बोचते मला ||


भांबावलेल्या अनावर त्या परिस्थितीत... 

कठोर आठवणींचा बंड झाला असताना... 

ही रात्र बोचते मला ||


साद देण्या प्राजक्ता वाट शोधताना... 

शशि शर्वरीचा कातर संवाद रंगताना... 

ही रात्र बोचते मला ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance