STORYMIRROR

manasvi poyamkar

Romance Others

5.0  

manasvi poyamkar

Romance Others

ही गुलाबी हवा

ही गुलाबी हवा

1 min
694


ही हवा गुलाबी

जणू तुज स्पर्शून आली

कोरड्या या मनाला

नखशिखांत भिजवून गेली

ही गुलाबी हवा

मज हलकेच काही म्हणाली

मी घेता ठाव मनीचा

ती स्पंदनात दडूनी गेली

ही गुलाबी हवा

दवा दवात उधाण झाली

खुलुनी पनाफुलांत

आज प्रितीत न्हाली

ही गुलाबी हवा

मज भाकीत सांगून गेली

टपोऱ्या डोळ्यात लपलेली याचना

तिने बोलकी केली


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance