STORYMIRROR

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Abstract

3  

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Abstract

हे वेध अंतरीचे

हे वेध अंतरीचे

1 min
316

हे वेध अंतरीचे, का खुणावतात मजला?

परी पाश हे मोहाचे, खेचती इथे जीवाला


बेगडी या जगात, नसे स्थान भावनेला

तरी व्यापार भावनांचा, मी मांडतो कशाला?


अरे पाहुणा इथे मी, उमगते जरी स्वतः ला

गुंत्यात या नात्यांच्या, गुंततो मी कशाला?


निर्गुण हा इथे रे, सगुण साकार बनलेला

तरी मोह हा फुकाचा, करतो मी कशाला?


हे गूढ जीवा शिवाचे, कळेल कधी रे मानवाला?

त्यागून पाश सारे, जाणेल का तो स्वतः ला?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract