STORYMIRROR

Kishor Zote

Tragedy

4  

Kishor Zote

Tragedy

हे महाराष्ट्रा

हे महाराष्ट्रा

1 min
305

हे महाराष्ट्रा...


मराठी भाषा बोलणाऱ्या महाराष्ट्रा

अस्तित्व बोली भाषा आणि इतर भाषा

जपताना इंग्रजाळलेली मराठी 

बोलतोय तू आज...


मेट्रो आणि महानगरीय संस्कृतीत

अब्रुची लफ्तरे वेशीवर फडकताहेत

शिवरायांची ती जरब

विसरलास का ?


पुरणपोळी मायेची आता

पिझ्झा खात आहे

चायनीझ फुड हातगाडीवर

वडापाव नामशेष होतोय...


नऊवारी साडी काष्टा आता नाही

लावणीचा ठेका विसरलोय काही

तमाशा तो फड टुरिंग टॉकीज

सांग कुठे आता पाहू ?


तांबडी माती कुस्तीचा डाव

मालिकेत तो पाहतोय

महाराष्ट्र तो माझा मी

शोध नव्याने घेतोय...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy