हे गणराया....
हे गणराया....
हे गणराया
अनाथांच्या नाधा,
लिहिताे कवितेत
जगण्याच्या गाथा...
हे गणराया
राेगराई हटव,
कराेनासारखे राेग
कायमचे कटव...
हे गणराया
भिज पाऊस पाड,
दुष्काळ, औदासिन्य
हे तर कायमचे गाड...
हे गणराया
उत्सव तुझ्या भक्तीचा,
पुनरावलोकन कर आम्हा
प्रत्यय तुझ्या शक्तीचा...
