STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Inspirational

3  

Abasaheb Mhaske

Inspirational

हे भारत माते!

हे भारत माते!

1 min
13.9K


जाती-पातीच्या नावावर विभागले वोट, एकदाच हात जोडणे, पाच वर्षे फक्त चोट

युरीया खाऊ, चारा खाऊ, देशभक्तांनो, मरा तुम्ही, श्रध्दांजली वाहतो आम्ही

नेते फिरंगी, बदनाम वर्दी,  आत्महत्या, हुंडाबळी, कुपोषण, दंगे-धोपे नी धर्मभेदी दरी, 

भाऊ भावाचा वैरी, भ्रष्टाचा-यांचा सुळसुळाट, तिजोरीत खणखणाट, जमले सारे ठोसर भिकारी 

कावळ्या-बगळ्यांची चंगळ भारी, भामट्यांची हुजरेगिरी

कॉप्या करा, पेपर फोडा, अभ्यास न करताही यशवंत व्हा

शिक्षणाचे  बाजार भरले पूर्वीची  संस्कारकेंद्रे आता कारखाने बनले

फुटकी थाळी, फाटकी झोळी, आमच्यासारखे आम्हीच असू

 भाड मे जाये जनता, काम अपना बनता, व्यर्थ कुणा कसली चिंता?

संधीसाधू नेते, मुजोर नोकरशहा, हक्कांबाबत उदासीन जनता

नाही कुणा कसली खंत, ज्याला- त्याला पोटाचीच भ्रांत

भारला कसा हा सारा आसमंत, भ्रष्टाचार शिरला नखशिखांत

थकेल जिव्हा सांगता सांगता , हे भारत माते! हाल तुझे बघवेना.

 

 


এই বিষয়বস্তু রেট
প্রবেশ করুন

Similar marathi poem from Inspirational