STORYMIRROR

Sanjay Dhangawhal

Inspirational

3  

Sanjay Dhangawhal

Inspirational

बाप

बाप

1 min
232

बाप त्याचे कष्ट परिश्रम वेदना

कोणालाच सांगत नाही

आयुष्यभर मर मर करताना

कुठेच थांबत नाही


मुलगा जेव्हा बापाच्या खांद्याला लागतो

तेव्हाच बाप थांबतो

मुलाच्या नजरेतून त्याचे

स्वप्न पाहतो


मुलगा बरोबरीचा झाल्यावर

बापाला जगण्याच्या वाटा मोकळ्या होतात

बापाच्या पावलावर मुलाचे पाय पडतात


चुकला असेल मार्ग 

तर बापच वळण लावतो

थोडं जपून पावले टाकायला सांगत असतो 

कुठे अडखळला तर

पडू देत नाही

बोट धरून अर्ध्यावर

सोडून जात नाही


म्हणून बापाने मुलाच्या खांद्यावर 

थोडी जबाबदारी द्यायची असते

बाप म्हणजे काय समजून सांगायचे असते


बाप जेव्हा कळेल

तेव्हा त्याला कर्तव्याची

जाणीव होईल

मगच त्याच्या नजरेने

जग सारं पाहिल


कारण...

बाप म्हणजे मित्रच असतो

त्याच्यासारखा माणूस 

कुठेच नसतो


म्हणून... बाप समजून घ्यायला

बाप व्हावे लागते

बापाच्या भूमिकेत जगताना

जरा सबुरीने घ्यावे लागते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational