STORYMIRROR

Ajinkya Guldagad

Inspirational Others

3  

Ajinkya Guldagad

Inspirational Others

विसरेल मी...

विसरेल मी...

1 min
223

विसरेल ती भेट ...आठवणीतील तुझी आता...

वगळेन ते सर्व क्षण ... जणू जगलोच नाही....

झाकेलं मी पापण्या ....दिसताच चेहरा आता...

सांजेल नयनांना ....जणू पाहीलेच नाही....

मोडेल त्या लेखणीच्या....भावनांचे टोक आता....

पुसेल सारी अक्षरे....जणू कोरलेच नाही....

भांबाळ आज जरी मी....जीर्ण जीर्ण आतून....

हसणार आज असा....जणू तुटलोच नाही.....

झाकेल आज प्रत्येक....धारदार घाव आता....

गुंफेल माझ्यात मी असा...जणू पडलोच नाही....

विसरेल त्या तुझ्या घराच्या...झिजविलेल्या पाऊलवाटा...

मिटवेल पाऊलखुणा त्या...जणू चाललोच नाही..

उगवेल मी पुन्हा..... नव् सामर्थ्याने आता...

झळकेल बघ एवढा... जणू विझलोच नाही....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational