हेच मला माहीत नव्हते
हेच मला माहीत नव्हते
सगळ्यांसाठी सगळे करायचे
ज्याची त्याची आवड जपायचे
मलाही काही आवडते,
हेच मला माहित नव्हते
कोणाला काय वाटेल?
कोणी माझ्यामुळे दुखवेल
ज्याचे त्याचे मन जपत आले
मला ही एक मन आहे
हेच मला माहित नव्हते
सुंदर दिसणे शृंगार करणे
माझ्या गावीही नव्हते
वय झाले म्हणून काय सुंदर दिसायचे नसते?
चाळीशीतही सौंदर्य खुलते
हेच मला माहित नव्हते
मी आहे पत्नी, आई बहीण
पण त्या आधी एक माणुस आहे
हेच मला माहित नव्हते
स्वता:साठी जरा जगायचे असते
हेच मला माहित नव्हते
मन मारून जगत होते
आनंदाने राहणे विसरले होते
माझ्यातच "मी" लपली आहे
हेच मला माहित नव्हते
