जाणता राजा..
जाणता राजा..
शिवकर्तृत्वाचा सुगंध
महाराष्ट्राच्या पावन मातीला ;
आसमंतही उणा पडे
वर्णाया शिवकीर्तीला .
शिवकाळात सुखी दीन
दलित- प्रजा -शेतकरी
दुःखितांचे दुःख पाहून
धावून सहाय्य करी.
शेतीला उत्तेजनाकरिता
माफ केला शेतसारा ;
कर्जबाजारी शेतकऱ्यांचा
कोरा केला सातबारा .
कामाच्या मोबदल्यात
आणली वेतन पद्धत ;
पहिल्या मराठी शब्दकोशाने
वाढवली मराठीची पत .
"पाणी आडवा- पाणी जिरवा"
ही शिवाजीराजांचीच योजना ;
"झाडे लावा- झाडे जगवा"
बिंबवले प्रत्येकाच्या मना .
उभ्या स्वराज्यात नव्हता
कोणी याचक- भिकारी ;
असे शिवराज्य होते पुढ्यात
सुख-समाधानाची भाकरी .
"परस्त्रीला मातेसमान" मानून
दिला आया-बहिणींना मान ;
"जाणता राजा" शिवाजी
अखंड विश्वाची शान .