दैवत
दैवत
धन्य ती जिजाऊ माता
जिने पराक्रमाचा वारसा दिला ..
सुसंस्काराचे धडे घेऊन
शिवबाने इतिहास घडवला ..
हर हर महादेवाचा गजर
हाती तळपती भवानी तलवार..
शत्रुरक्ताने तिला नहाण्या होई
शिवाजीराजे घोड्यावर स्वार ..
शिवबाची तलवार सरसर
गनिमांना कापत असे ;
शिवरुद्रावतार पाहुनी शत्रू
जीव मुठीत घेऊन पळतसे .
शिवरायांच्या हरेक मोहिमेत
गनिमी युक्त्यांचा वापर..
"शिवा" नावाने दिल्लीच्या
बादशाहीला भरे काफर.. .
शिवराय पराक्रमी - स्वाभिमानी
धर्मनिष्ठेचा अंगार मूर्तिमंत ;
स्वतंत्र भगवा फडकवला
स्वराज्य निर्मिले किर्तीवंत .
संघर्ष- कष्ट -धावपळ हीच
शिवरायांची जीवनगाथा ..
म्हणून शिवप्रतिमेपुढे
झुके नित्य आपला माथा ..
बळी- प्रजेचे राज्य स्थापूनी
विश्वी निर्माण केली पत ;
जाणते राजे शिवराय सकल
मराठी बांधवांचे आराध्य दैवत .