भरारी
भरारी
अवकाशातील स्वारी लीलया करितसे ही ललना
पायलट अन् वैज्ञानिक जगतीही आपली कल्पना!!१!!
शक्तिशाली मी सतत ध्यास हा सुवर्णपदकांचा
बबिता फोगाट आहे अभिमान हरियाणाचा !!२!!
परिस्थितीला झुंज देवुनी बॉक्सिंग क्वीन आता
विश्वचषक गर्वात मिरवते मेरी कोम ही माता!!३!!
परित्यक्ता तरीहि मी आहे सहस्त्रकन्याचि आई
लाड प्रेम अन् त्याग करूनही झाले त्यांची माई!!४!
नभी तारका अनेक पण मी शुक्राची चांदणी
चिरनिद्रा घेताचि झळकले ऑस्करच्या अंगणी!!५!!
माता भगिनी कन्या जाया नसे अबला मी करारी
नयनी स्वप्ने विश्वास जीवनी घेते उंच भरारी!!६!!
