सावर ग
सावर ग
सखे ओलावा फार झाला
पडदे नयनांचे आवर ग धृ
तुझ्या केसांना मोकळ्या
हवेत सोडू नको आवर ग
मेघाना हेवा वाटेल त्यांचा
बरसतील धबधबा सावर ग ।।१
काजळ सांगे रेखताना
तुझा आरसा आवर ग
ओघळताना दव हे गाली
गुलाब गालिचे सावर ग!!२!!
किणकिण बिलवरांना
गोठ पाटली ने आवर ग
शब्द नाही बोलत जरी
यांचा कलरव सावर ग !!३!!
साज कोल्हापुरी लेवून
भाळीची बट आवर ग
काळीज धडधडायला लागलं
यौवन बहर सावर ग!!४!!
आरती ओवळताना दिवा
मनाची घालमेल आवर ग
तुझे अनुभव तुजपाशी
चर्चा जगाशी सावर ग!!५!!

