STORYMIRROR

Dhanashree Dharkar

Inspirational

3  

Dhanashree Dharkar

Inspirational

ती पणती......

ती पणती......

1 min
169

मिणमिणत्या पणती पुढती

अंधार चोरटा होतो,

तिचे जळणे नाजूक तरीही

प्रकाश तेवढा होतो!


सहज शांत तेवत असते

लवती कोवळी आच,

तिमिराशी लढते अलबत

तिज पवनाचा जाच!


सांगा तमासंगे कोठे तिजला

अहो नांदायाचे खास

पण हा समीर वाहत आणे

तिचा जगण्याचा श्वास 

 

या वाऱ्याचे आडदांड वर्तन

बुजवून तिज टाके,

तोच सहज मोहक असता

ती घे त्याच्या संगे झोके!


लखलखीत उजळून टाकी

आडोसा दे ती ओंजळ,

मग वायुसी पोरका करते

का तिची ती सळसळ!


आसपास मिळतची असते 

तिच्या प्रेमाची ती उब,

परी जो तेज रोखतो तै त्यासी

चटकाही देते खूब!


जरी नेमके जाणून असते

त्या ज्वलेशी नाते सख्खे,

संयमाशी असलेली ती मैत्री 

कायम जपून राखे!


बघा ना कोठेही लावा तिजसी

ठेवे गुणधर्म गाठी,

कदा मर्यादा विसरत नाही

जै ती लहान वा मोठी!


तेलाचे इंधन जणु ती माया

वाती रूपात जळते,

तिज राउळी म्हणुनी मान, ती

देवापुढती असते!


Rate this content
Log in

More marathi poem from Dhanashree Dharkar

Similar marathi poem from Inspirational