लाडाची लेक
लाडाची लेक
तुच माझी लाडकी लेक
तुच माझी भाग्यलक्ष्मी
कधी लहान होते
काहिहि हट्ट करते..
कधी मोठी बनून
समजवून सांगते
माझी भाग्यविधाता
आणते घरपण...
अश्रूंनी काळीज पिघळावते
हास्याने घर मोहरते
माझी परी होईल
कधी परक्याच धन...
माझ्या घरचा जीव
दुसर्यांची होऊन जाईल
घराचा असे ती उंबरा
जसा सुर देई तंबोरा...
जशी वृदंवनातली तुळशी
भासे कुंभावरची कळशी
जशी देवापुढची पणती
जपमाळेची ती गनती...
जसा अगरबत्तीचा ती सुहास
जाई जुई चा तो वास
आई वडिलांची ती अभिमान
जस पुण्य ते कन्येच दान....
