हैवानांच्या गर्दीत माणूस
हैवानांच्या गर्दीत माणूस
ना आई समजत
ना बहीण समजत
त्यांच्या अब्रूची लक्तर
दिवसाढवळ्या लोंबवत आहे
आणि या हैवानांच्या गर्दीत
आम्ही माणूस शोधत आहे
कोणी नाही कोणाचे
इथे सख्या भावाच्या रक्ताचे
आहेत भुकेले
आणि या हैवानांच्या गर्दीत
आम्ही माणूस शोधत आहे
भावना शून्य होऊन
हृदय यांचे पाषाण
झाले आहे
आणि या हैवानांच्या गर्दीत
आम्ही माणूस शोधत आहे
मुक्या प्राण्यांची किंमत
यांच्यासाठी अगदी शून्य आहे
आणि या हैवानांच्या गर्दीत
आम्ही माणूस शोधत आहे
मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणी
खाणारे इथे भरपूर आहे
आणि या हैवानांच्या गर्दीत
आम्ही माणूस शोधत आहे
माणूस ओळखेना माणसाला
स्वार्थापोटी यांनी सर्व नाती
गहाण टाकली आहे
आणि या हैवानांच्या गर्दीत
आम्ही माणूस शोधत आहे
