STORYMIRROR

Sonam Thakur

Comedy

3  

Sonam Thakur

Comedy

हास्य काव्य

हास्य काव्य

1 min
901

लॉक डाउन मुळे झाला चांगला बदल नवऱ्याला आता चांगलीच घडली अद्दल

जो कायम असायचा मित्रांच्या घोळक्यात तो आता सापडला माझ्या विळख्यात

आठवला मला मोदींचा नारा त्यांना म्हंटलं आता गपचूप घर आवरा

त्यांना ही पटला माझा विचार कारण बाहेर पडला तर मिळेल लाठी मार

यशस्वी झाली माझी चाल एक कप चहा ने केली कमाल

वरून दिली बिस्कीट दोन म्हंटलं काम करा गपचूप धरून मौन

जेवणात आता ना मिळे कोंबडी ना मटण

रोज डाळ भात खाऊन घटले त्यांचे वजन

करी तांडव कोणीतरी द्या रे वडे मिसळ आणि भजीच्या आठवणीने मन झाले वेडे

धुतले कपडे स्वच्छ केले घर

प्रेमाने सांगितलं की मदत करतात मला मिस्टर

सायंकाळी मग मी ही केली त्यांची wish पुरी

जेवणाच्या ताटात त्यांच्या वाढले वडे आणि चिकन करी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Comedy