STORYMIRROR

Sarika Sarkale

Inspirational

3  

Sarika Sarkale

Inspirational

हा नाश थांबवा

हा नाश थांबवा

1 min
3.1K

हा नाश थांबवा भूमातेचे तनमन जळते आहे 

ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे 

पृथ्वीच्या पाठीवरती ही अफाट झाली गर्दी 

गर्दीतच जन गुदमरती दुःखात किती तळमळती

हे संततीचे अज्ञान जगाला भेसूर छळते आहे 

ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे

या नद्या नव्हे रे गंगा संजीवन तुजला देती 

तू करूनी जल अपवित्र का पाप घेतोस माथी 

हे पात्र नद्यांचे सुखमय कर दुसरीकडे वळते आहे 

ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे

हा नाश थांबवा 

ही झाडे तुजला देती रे उन्हात शितल छाया

अन् मधूर फळे पुरवीती रे जीव तुझा जगवाया 

तव कुऱ्हाड झाडावरती नाही तुजवर पडते आहे 

ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे 

हा नाश थांबवा,हा नाश थांबवा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational