गुरू महिमा
गुरू महिमा
गुरूवर्य तू शिल्पकार समाजाचा
समाजाचाच तुला रे आधार
देवूनी दिशा बालगोपालांना
करी तयांचे स्वप्न तू साकार.....
जीवनास त्यांच्या साकारतो
शाब्दिक आधार तयांना देतो
कोणतेही शैक्षणिक कार्य असो मुलांचे
शिक्षक मदतीला मुलांच्या येतो...
स्वप्नांना मुलांच्या गुरूवर्य खतपाणी घालती
योग्य दिशा बालकास आपल्या देतो
गुरूवर्य शिष्यास नावारूपाला आणतो
आनंदाने स्वतःच भारावून जातो..
आल्या अनंत अडचणी कितीही तरी
गुरुवर्य त्यातून वाट ह
ो काढती
वसा हा तयांचा बालके चालविते
सर्वांच्या कौतुकास पात्र ठरती....
आकार देवून मातीसम गोळ्याला
ज्ञानी बनवले गुरूने बालकाला
आजच्या या शिक्षकदिनी गुरु महिमा
सन्मानाने गौरविले आपल्याला...
कार्य गुरूवर्यांचे असे महान
देतसे सर्वांना उत्तम ज्ञान
कर्माचे ठेवूनी नेहमी भान
भावी नागरिक घडवी छान.....
या गुरूवर्यांच्या कार्याला नसे तोड
कर्माची फळे नेहमीच गोड
वाणी भासे आंब्याची फोड
केली गुरूवर्यांनी सदा तडजोड....