गुरुत्वाकर्षण
गुरुत्वाकर्षण
झाडाखाली झोपला होता एकदा न्यूटन
डोक्यावर पडले सफरचंद पटकन
रात्र अन् दिवस विचार करू लागला न्यूटन
सफरचंद वर का नाही गेले भुरकन
चेंडू बघितला त्याने वर फेकून
तोही आला खाली वरून
मारली त्याने वर उंच उडी खालून
तरी आला तो खालीच तिथून
अस्वस्थ झाला न्यूटन
शेवटी शोधले गुरुत्वाकर्षण
पृथ्वीचे हे आकर्षण
त्यालाच म्हणतात गुरुत्वाकर्षण
