STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

4  

Prashant Shinde

Inspirational

गुरुस आदरांजली प्रार्थना...!

गुरुस आदरांजली प्रार्थना...!

1 min
523


वास्तुविशारद व्ही.आर.सरदेसाई,पुणे.


वैकुंठ वैकुंठवासी झाले...!

वैकुंठ वैकुंठवासी झाले

माझ्या डोळा पाणी आले

बरेच पाणी पूला खालून गेले

गेले ते दिन गेले...!


आठवले मज क्षणाक्षणाचे सारे

वहात होते तेंव्हा मोसमी वारे

त्यांनी उघड्या डोळ्यांनी दिवसा

मुला मुलात पाहिले चमकणारे तारे


काही अवती भोवती मिण मिणले

काही दूर फेकले गेले

काही काही विजूनही गेले

काही निस्तेज होऊनी तगले

मोजकेच तारे चमकू लागले


नाव गुरूंचे काढू लागले

त्या ताऱ्यांचे तेज आगळे

आसमंतही दिपून गेले

वैकुंठाची ही किमया सारी

प्रत्येक ताऱ्यात तो तेज पाही


त्याला एकट्यास होती खात्री

म्हणून द्यावयाचा तो सदा ग्वाही

आज त्या ग्वाहीचे चीज झाले

वैकुंठ वैकुंठवासी झाले तरी

नजरे आड असले जरी ते


ताऱ्यांच्या तेजात चमकतात खरे

गुरू असावा कसा हे

वैकुंठासी नाळ जुळता वळे

ज्याने त्याने ते जे अनुभवले

ज्याचे त्याचे त्यालाच कळे


परीस जीवनात लाभला

भाव हा सदैव मनी राहिला

त्या स्पर्शाने जीवाचे सोने झाले

गुरू जाता कळले मला

जळी काष्टी पाषाणी आठव

सदैव उरात राहुनी गुरू दावी


आशीर्वादाचा हात पाठीवर ठेवुनी

भिऊ नको म्हणुनी काळजी वाही

वैकुंठ वैकुंठवासी झाले

तरी अंतरी शिष्यांच्या उरले

म्हणुनी आठवणीत मज

हे काव्यांजलीचे काव्य स्फुरले


इतुकेच विनवितो प्रभू चरणी

शांती लाभो गुरुआत्म्यासी

नाते असेच जुळून राहू दे

आशीर्वादाचे आमच्या पाठीशी....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational