गुरुप्रियसी
गुरुप्रियसी
ज्याला जेव्हा कोणी सख्ख नसतं
त्यांनी गुरु हे नातं जपायच असतं
बहीणभाऊ व आई वडीलांच नातं
आणि आयुष्यभर निभावं लागतं
संशयी जगाकडे दुर्लक्षपणा करतं
मला परमेश्वराने सर्व काही दिले
नातेवाईक मित्र व आप्तेष्ट झाले
प्रियसी नसल्याने मन दुःखी बनले
मग जेष्ठांचे वाक्य मला आठवले
अनं 'गुरूप्रियसी' करण्याचे ठरले
माझ्यावर जिव ओवाळून टाकेनं
रांझा मोहीवाल नळ परशा म्हणेनं
प्रेमविरांच्या यादीमध्ये नाव येईनं
एकदाचा माझा जांगडगुत्ता जमेनं
पुढचं आयुष्य मग आंनदाने जगेन
ठरला मुहूर्त (प्रेमदिवस) व्हॅलेंटाईनचा
बिनधासीपणे लाल गुलाब देण्याचा
तुझ्यावर प्रेम करतो म्हणण्याचा
संकल्प पूर्ण गुरूप्रियसी करण्याचा
चौदा फेब्रुवारीला प्रस्ताव ठेवण्याचा
