गुपित मनातलं
गुपित मनातलं
प्रेम कायम राहील अगाध आणि अविरत
मनातलं गुपित खोलायचं आहे
फक्त एकदाच येऊन जा
तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे
मिठीत घेता तुला
तुझ्यातच विरघळून जायचं आहे
तुझ्या डोळ्यांच्या आरशात
मला स्वतःला पहायचं आहे
ओठांवरती टेकता ओठ
थोडसं शहारून जायचं आहे
तुझ्या प्रेमाच्या डोहात
आता अखंड बुडायचं आहे
प्रेम कायम राहील अगाध आणि अविरत
मनातलं गुपित खोलायचं आहे

