गुंता
गुंता
भावनांचा खेळ सारा
खऱ्या पाठी धावतो आहे
गुंतत सारा गुंता हा
मनाला वेढतो आहे,
जुलमी गड्या विचार सारे
एके ठिकाणी अडते आहे
"हे" उत्तर याचे म्हणता म्हणता
प्रश्न पुढचा पडतो आहे,
भावनांचा खेळ सारा
खऱ्या पाठी धावतो आहे,
मन खातंय ठेचा इथे
विचार मात्र मरतो आहे
सहन शिलतेच्या डोक्यावरती
नशीब खापर फोडते आहे,
भावनांचा खेळ सारा
खऱ्या पाठी धावतो आहे
गुंतत सारा गुंता हा
मनाला वेढतो आहे.
