STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

गुणार्णव गणपतीबाप्पा

गुणार्णव गणपतीबाप्पा

1 min
240

गणपतीबाप्पा वंदन तुजला

सकल विद्या नि कलाधिपती

ज्ञानसंपन्न विद्वान देवाधिदेवा

किती वर्णू गणराया ख्याती


पृथ्वीप्रदक्षिणा त्वरे केली

थोर मातापित्यांना मानले

चंद्राचा नक्षा उतरविला

सिंधू राक्षसासी मारले


कर्ता ,करविता , बुद्धिदाता

किर्तीवंत सुपुत्र उमा महेशाचा

चौदा विद्या नि कला जाणता

कार्यारंभी मान अग्रपूजेचा


विघ्नहर्ता तू करी संकटनाश

भक्त प्रार्थिती नवसाचा मान

गुण देवा अपंरपार शब्दातीत

प्रयत्न देवा माझा गोड तू मान


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract