STORYMIRROR

Sanket Yadav

Romance

3  

Sanket Yadav

Romance

गुलाब कळी

गुलाब कळी

1 min
535

अनेक पानांच्या आडून एक कळी उमलत होती 

एकटीच म्हणून कि काय जरा जास्त लाजत होती


वाऱ्याच्या तालात आपल्याच धुंदीत डोलत होती

गुलाबी त्या रूपाने अनेकांना भुरळ पाडत होती


असावी कदाचित ओढ तिलाही माझ्या ओजळीची

म्हणूनच वाट पाहत असेल माझ्या येण्याची


 गंध तीचा दरवळू पाहतोय 

जणू एकरूप होऊन माझ्यातच मिसळू पाहतोय


खूप सारी पान तिच्यासाठी जागतायत

तिच्या अवतीभवती खेळू पाहतायत


कळी उमळणार म्हणून रात्रभर पहारा देतोय खरं

फक्त माझ्याआधी कोणी चोरली नाही तर बरं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance