STORYMIRROR

Sanket Yadav

Abstract Romance Others

4  

Sanket Yadav

Abstract Romance Others

प्रियकर सजला

प्रियकर सजला

1 min
352

तुझ्या ओठांवर विरलेला प्रश्न आज कळला

मजवर निश्चल मृगनयनांनी कटाक्ष जेव्हा टाकला

ओंजळीत आज पाऊसही भिजला

तुझ्या प्रेमाच्या रंगात हा प्रियकर सजला


कळता प्रश्न मला तुझ्या गाली गुलाब हसला

तुझं रूप निहारण्या तो क्षणही तिथेच थांबला

तुझं पाहता तो चंद्रही मंदावला

तुझ्या रुपेरी तेजात हा प्रियकर सजला


तुझ्या मोकळ्या केसात मोगरा गंधाळला

डोळ्यातली ओढ पाहून तो क्षणही मधाळला

झुकलेल्या पापण्या पाहून जीव भारावला

तुझ्या श्वासात आज हा प्रियकर सजला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract