होऊन ये तू
होऊन ये तू
वेचतो कोमेजल्या पाकळ्या
आयुष्याला रंग ना गंध उरला
सोनचाफ्याचा रंग होऊन तू
मोगऱ्याच्या संगतीने गंध होऊन ये तू
अंधारले विश्व काळोखी वाट
अंधुक स्वप्न ना दिव्याची साथ
काजव्याचा दिवा होऊन तू
चांदण्यांच्या संगतीने चांदवा होऊन ये तू
रीमझिम पावसात आठवनिंच्या गर्दीत
नयनी अश्रु, शब्द-भाव वेचून तू
प्रेम गीत होऊन ओठी शब्द होऊन ये तू

