सखी
सखी
एक बॅग आणि आयुष्याची स्वप्नं घेऊन आलो होतो कॉलेज मध्ये,
आणि निघताना बॅगेत मावणार नाहीत इतक्या तुझ्या आठवणी घेऊन जातोय,
विसरणार नाही मी कधी, कारण यानंतर आठवणीच जास्त जवळ असतील,
ती झालेली मैत्री आणि तयार झालेलं सखा-सखी च नातं
ही भेट जणु आयुष्यातल्या आनंदी क्षणांपैकी एक,
खूप प्रेम दिसायचं , खूप possessive असायचीस आणि काळजी तर अधिकच,
खोडसाळपने दुसऱ्या मुलींची नाव घेतली कि चिडून रुसणारी तू अनं पाणावलेले तुझे डोळे,
तुझ्या डोळ्यात दिसणारं माझ्यावरच प्रेम,
वेळ पडली तेव्हा चालू lecture मध्ये तू लिहून दिलेली assignment ,
हातात हात घेऊन तासंतास केलेल्या गप्पा आणि तुझं ते प्रेमळ बोलणं ,रोज एकमेकांना शोधणं ,
कारण नसतानाही तुझं रुसणं आणि मी मनवू तुला तर तुझं पुन्हा नाराज होणं,
विनाकारण रुसवेफुगवे आणि भांडणं आणि दुसऱ्या क्षणी दोघांना सोबत पाहून अख्या classmates चं जळण ,
एक मुलगी असून पण माझ्यासारख्या एका चिडक्याल्या एवढ सांभाळून घेतलंस,
अचानक झालेला lockdown त्यात भेटता येत नव्हतं म्हणून माझ्या मनाची झालेली तळमळ,
एकदा रात्री उशिरा तू केला call आणि तुझा भारावलेला आवाज मीही काही वेळ शांत, शेवटी सहज केला call म्हणून सावरलेली ,
तुझ्याशी बोलताना मानातल्यामनात झालेला आनंद आणि उगाच आलेलं हसू,
नाही विसरू शकणार कधी,
आयुष्यभर सोबत राहण्याचं वचन दिलंय ,
सगळं खूप छान होत, सगळ्याची आठवण येईल
इतक्या गोड क्षणांना कोणी कसं विसरु शकेल

