STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Inspirational

3  

Meenakshi Kilawat

Inspirational

गुढी

गुढी

1 min
1.0K


*गुढी उभारू *

आज गुढीची पुजा करूया आपण

साक्षरतेची ज्यौती पसरवू या जनात

नवकार्याची नवश्रोताची ज्यौती भरूनी

सूर्यासारखे तेज भरूया जनामनात.......!!


चैत्रातील ही सुंदर नवरंग

शिकवीती हा एकतेचा महामंत्र

वसंत बघा कसा फुलला आहे

जणू जाणत असे विद्येचा तंत्र...!!


किल्मिशाच्या या गुप्त सावल्या

गुढीला मनोभावे अर्पण करावे

चेतना साक्षरतेची घेवूनी आता

निरक्षरतेला दूर भिरकवूया.....


नव उंमगाचे नव तरंगाचे

चांदण्यात स्वप्न हे पाहू चला

नव सूर्याची किरणे घेवूनी

सुविचार जनामनात पेरू चला.....


शिक्षण घेण्या वाहून घ्यावे

व्हावे निष्ठावान अन् सक्षम

अनेक रंग या निसर्गात असावे

ना कोणी जगात या अक्षम........

माणुसकीला ओळख देण्या

वेळीच करावे जनकल्याण

गरजू विद्यार्थ्याची घेवूनी दखल

साक्षरतेची ही दिव्य द्यावे भूषण.....


नाही कोणी इथे निरक्षर

नाही हतबल कोणी

होवूनी विद्यावंत जगुया आपण

राहो न इथे कोणी अडाणी....


चैतन्याची ही गुढी उभारूनी

मधुर गोडवा मनामनात भरावा

शुभदायी हे चैत्रारंभ कार्य सारे

समाज जपा अन् मीपणा त्यागावा....!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational