ग्रंथ हेच गुरू-कविता
ग्रंथ हेच गुरू-कविता
मला ग्रंथ गुरू लाभले
दु:ख अंतरीचे गेले
मार्ग ज्ञानाचा सापडला
जगात मार्ग तू दाखविला
त्याच्या सारखे दैवत
जगी मानवाच्या सुखात
परमानंद मला मिळे
त्याच्या सहवासात मिसळे
असा अगाध महीमा
तिसरा डोळा आम्हा
अज्ञानास दिले ज्ञान
अंधारमय सारीले जीवन
ज्ञानाचा दिवा पेटवून
विश्वाला दिली शिकवण
शोधून लाखात एक दागिना
ग्रंथाविना कुठेच मिळेना
सुख,शांतीचा आगर
समाधान चित्ती भरपूर
जीवनाचा खरा सारथी
ग्रंथा तुज्यासारखा साथी
मन,धन सर्व काही
तुझ्यासारखी श्रीमंती नाही
आनंद तू देणारा
संकटी तूच तारणारा
वाचन जनाचे अमर
जीवन घडविले थोर
संस्कार,संस्कृती माहेरघर
सर्व शब्दांचा भव सागर
भाषेचा आत्मा तू
दानशूर वाटाड्या तू
अनमोल तुझे उपकार
कधी पडणार नाही विसर
