STORYMIRROR

Rutuja kulkarni

Abstract Tragedy Inspirational

2  

Rutuja kulkarni

Abstract Tragedy Inspirational

गर्दी तर इथे आहे खूप

गर्दी तर इथे आहे खूप

1 min
13

गर्दी तर इथे आहे खूप नात्यांची,

पण नेमके कोणाला आपले म्हणावे?

भावनांचे मुखवटे घातलेले भेटतील रोज,

पण त्यातून खरे चेहरे कसे शोधावे?


गर्दी तर इथे आहे खूप नात्यांची,

पण नेमके कोणाला आपले म्हणावे?

स्वार्थ साधण्यासाठी वापर करणारे आहेत खूप,

पण दुस-यांसाठी जगणारे कुठे शोधावे?


गर्दी तर इथे आहे खूप नात्यांची,

पण नेमके कोणाला आपले म्हणावे?

वेळ आल्यावर सोडून जातील बरेच,

पण वेळेवर मदत करणारे कुठे शोधावे? 


गर्दी तर इथे आहे खूप नात्यांची,

पण नेमके कोणाला आपले म्हणावे?

प्रेमाचे झरे इथे वाहतील लाखो,

पण खरे प्रेम त्यातून कसे शोधावे?


गर्दी तर इथे आहे खूप नात्यांची,

पण नेमके कोणाला आपले म्हणावे? 


ज्यांना आपले म्हणून आपण जपतो,

तेच तर नेहमी मन दुखवून जातात,

आपण मानतो जवळचे ज्यांना,

ते तर हल्ली आपल्या ला परके करून जातातं


गर्दी तर इथे आहे खूप नात्यांची,

पण नेमके कोणाला आपले म्हणावे?



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract