गर्भी अंकुर खुलला...
गर्भी अंकुर खुलला...
हर्ष पोटात मावेना
गर्भी अंकुर खुलला
मनी तिच्या गं सखये
झुला आनंदे झुलला
किती सुखद कल्पना
जीव आकारे इवला
गोड त्या हालचाली
अंगी शहारा फुलला
गंध तिच्या मातृत्वाचा
चोहिकडे गंधाळला
येता चाहुल आतून
जीव तिचा सुखावला
ठोका काळजाचा त्याच्या
तिच्या कानी विसावला
नाळ जुळे लेकराची
मनी बंध स्थिरावला
