STORYMIRROR

Chandan Pawar

Inspirational Others

4  

Chandan Pawar

Inspirational Others

" गर्भहत्या "

" गर्भहत्या "

1 min
439

कलियुगाचा महिमा पाहता

काळीज काफर झालं;

जन्मदात्या माय-बापाला

कन्यारत्न जड झालं.


कशा चिरडतात गर्भातील 

नाजूक कळ्या होऊन निर्दयी;

काळजातील प्रेमझरा आटला

झालो आपण पाषाणहृदयी.


जन्मापूर्वीच 'गर्भहत्या' करून

घेऊ नका मुलींचा बळी;

पापाचे वाटेकरी होऊ नका 

तोडून नाजूक कळी.


प्रेमभावना संपेल मुलींविना

रुक्ष होईल सारी सृष्टी;

डोळे उघडून बघा नीट

लोपली कुठे दूरदृष्टी.


गर्भसंस्काराच्या नावाने

होतात लिंगभेदाचे दु:संस्कार;

साम-दाम वापरून करत

आहेत गर्भहत्येचा आचार.


हुंड्यापोटी स्वार्थी मोहाला

कोणीही बळी पडू नका;

उदरातल्या लेकी-बहिणींना

उदरातच चिरडू नका.


स्त्री विना अपूर्ण जीवन आपुले

सकारात्मकतेने विचार करा;

ज्ञानेश्वर होण्या मुक्ताईचा

"स्त्रीभ्रूण हत्या" बंद करा.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational