ग्रामीण संस्कृती
ग्रामीण संस्कृती
सकाळी उठता मायेची
जात्यावरची ओवी येई काऩी
रुणझुण घुंगराची गोठ्यात
हंबरे वासरासाठी गाय़ी
'
सडासारवणं करी
रांगोऴी शोभे अंगणी
आदर तिथ्य सारयांचे
सुनवारी करी अन् घरधनी
माय घेई डोईवर चुंबळ
त्यावर मोठी घागर
कष्टून जीव थकल्यावर
खायी दुपारला भाकर
अंध:कार तो दूर कराया
लावले जाई दिवे
त्या प्रकाशात पुस्तक वाचून
बाळ घेत असे धडे
मोठया कौतूकाने माय
पाठीवरुन हात फिरवी
बाळ काळ्या काळ्या पाटीवर
अ,आ,ई अक्षर गिरवी
बाप राजबिंडा
कष्टाने पिकवे दाणे
त्यातूनच करे दानधर्म
रात्री भजन कीर्तन गाणे
आजी आजोबा,काकाकाकू
घरात पुरवे लाळ
संस्कारच्या गोष्टी आजीच्या
संस्कृत् होई बाळ
गावगाड्याच्या कार्यक्रमात
तरुनाई जाई डुबून
गाव होता येक
संकटात येई धावून
होते अपार कष्ट
पैका होता थोडका जीवना
माणूसकी होती लाखाची
तोच गावाचा होता गहेना
श्रावणात सरी जशा
बरसून जाई हरघडी
हिरवा शालू पाघंरून धरती
राहे तवा बारमाही
पोळा ,दसरा,दिवाळी ,
होळी,तो चौदा एप्रील चा सण
गाव दुमदूमन जाई
वाटे सर्व सधनं
मायी ग्रामिण संस्कृति
होती एक लाखात
आज जरी आले डिजीटल युग
जीव गेला ध्योक्यात
रसायनाने जीवन सारे
झाले रोगाने ग्रस्त
डॉ.झाले महाग
जीवन झाले स्वस्त
परिवर्तन जग हे
माऩ्य मिही करते
"ग्रामिण संस्कृती"भलिच होती
आजही ठासून सांगते
