गंधित नाते...
गंधित नाते...


नाते मनाचे आगळे-वेगळे
कोवळया धाग्यात ओवलेले...
स्पंदनात अबोलपण जपता
ऋतू सुगंधित विश्वासाचे...
जणू नाजूक कळी फुललेल्या
फुलासम बहरून येणारे...
गोड स्मितहास्यासोबती
खळखळून साद घालणारे...
शब्दांवाचून अडखळलेले
बोल अंतर्मनी रुजणारे...
नाते गंधित श्वासाआड
जीवन शृंगारणारे...