गीत जीवनाचे
गीत जीवनाचे
का नित्य रोज होती, बदनाम प्रश्न सारे?
घे सत्य एक ध्यानी, उत्तरच गूढ बा रे!
उफणून घे जरा तू, ते धान्य साठलेले!
होईल साफ बघ ते, सुटताच छान वारे!!
सोडून हातच्याला, पळतोस का असा तू?
आलाय घास जो तो, मानून गोड खा रे!
आहे रटाळ थोडे, हे गीत जीवनाचे!
देऊन चाल न्यारी, जोशात तेच गा रे!!
आले किती इथे बघ, येतील यापुढेही!
कर्तृत्व कर असे अन् सोडून छाप जा रे!