STORYMIRROR

ANJALI Bhalshankar

Abstract

3  

ANJALI Bhalshankar

Abstract

गिधाडं

गिधाडं

1 min
168

हो मी सोडलय आता व्यकत होण .गटारात लोळणारया डुंकराची ,

अन आकाशात घिरट्या घालत प्रेतावर तुटुन पडणारया गिंधाडाची जमात माझ्या सभोवती वावरतेय

यांना कुणाचंच पडलेल नसत खुर्चीत आणि सत्ता यातच सार लक्ष एकवटलेल असत.

सामान्य, लढतो, खचतो, हरतो पीचतो, मग मरणाला जवळ करतो, या आशेन कि संपेल सार श्वासासह.

 परंतु तिथेच तर खरी सुरुवात असते,.त्या निर्जव देहाची चिरफाड बाकी असते,

जात, धर्म गरीब, श्रीमंती यानुसार त्याची विभागणी होते मग

न्याय नावाची गोष्ट हद्दपार होऊन

जातीनिहाय चोंकशया सुरु होतात.

चर्चा होतात ऐक जीव गेलाय हे कोनाच्या गावीही नसते.

या गिधांडाना फक्त सावज हवे असते. मंताच्या पेट्या भरण्यासाठी..

चर्चा चिघळून चार दिवस प्रकरण काळाआड जाते.

मग पुन्हा स्वप्निल......पुन्हा आणखी कुणी?.................

.हि यादी वाढतच राहील .गिधाड घिरटया घालतच रहातील..............

अगदी पृथ्वीच्या अंतापर्यंत................पोसत रहातील त्या ऊपेक्षीत रकतावर...................



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract