STORYMIRROR

Shila Ambhure

Inspirational

4  

Shila Ambhure

Inspirational

घर दोघांचे

घर दोघांचे

1 min
27K



घर दोघांचे हे

आहेच सुंदर.

शोभून दिसते

मायेचे मंदिर.


अंगणात सडा

रांगोळी रंगीत.

ऐकावया येते

निसर्ग संगीत.


एकत्र कुटुंब

इथेच नांदते.

अतिथि जनांना

घर हे वंदते.


प्रेम, आपुलकी

राहते घरात.

बकुळ उभाच

स्वागता दारात.


याचक ना जाई

रिकाम्या हाताने.

ओंजळ भरते

दही नि भाताने.


घर दोघांचे हे

असेच फुलावे,

ओठांवरी हसू

नितळ खुलावे.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational