STORYMIRROR

Aasavari Ainapure

Abstract

4  

Aasavari Ainapure

Abstract

घन गर्जत गर्जत आला

घन गर्जत गर्जत आला

1 min
216

घन गर्जत गर्जत आला

मी अधीर आतुरलेला

त्या एका थेंबासाठी

जीव व्याकुळ व्याकुळलेला


वन नुसते रखरखलेले

नभ पुरते झाकोळलेले

कोसळण्या जरी भूवरी तो

अबोध आसुसलेला


धरणीही जाहली तप्त

करी आक्रोश काहिलीचा

बरसण्या सरींवर सरी

तो मल्हार आळविता झाला


सृष्टीचे मोहक रूप

साठवितो मीही मनात

त्याची होता कृपादृष्टी

मी थेंब थेंब टिपलेला


उतरला तो ही माझ्या

मनात खोलवर जेव्हा

जाणवून सय त्याचीही

मी चिंब चिंब भिजलेला......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract