STORYMIRROR

SANJAY SALVI

Inspirational

3  

SANJAY SALVI

Inspirational

घे उंच भरारी..

घे उंच भरारी..

1 min
465

घे उंच भरारी उंच भरारी उंच भरारी घे,

अवघ्या विश्वाला कवेत आपुल्या सामावून तू घे, 


नको बसून राहू अश्रू ढाळत स्वप्न लोचनी घे,

दूरदृष्टीने स्वप्न आपुले साकारून तू घे,

घे उंच भरारी उंच भरारी उंच भरारी घे,


नको चौकटीत तू बांधून घेऊस मार्ग स्वतःचा घे,

अविरथ अथक परिश्रमाने ध्येय आपुले घे,

घे उंच भरारी उंच भरारी उंच भरारी घे,


सृष्टीची ही उधळण सारी अष्ठभुजांनी घे,

दाहीदिशांनी प्रसवलेला प्रकाश प्राशून घे,

घे उंच भरारी उंच भरारी उंच भरारी घे,


घे भरभरून घे समरसून घे प्रसन्नतेने घे,

अन जमेल तेव्हा जमेल तसे इतरांना पण दे,

घे उंच भरारी उंच भरारी उंच भरारी घे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational