घडामोडी
घडामोडी
कुठ गेल ते पाटांच शुद्ध झुळझुळ पाणी,
नदी नाल्यांना दुशित केल कुणी ....
कुठ गेल खाद्य गावरान ,
आता संकरीतमुळे आजाराने झाले हैराण ...
कुठं गेली ती पक्ष्यांची मंजुळ गाणी ,
आता पक्ष्यांना नाही राहील प्यायला शुद्ध पाणी ...
कुठं गेल ते गावाच गावपण ,
आता जो तो दाखवतो स्वतःच शहाणपण
कुठं गेला तो आजीबाईचा बटवा,
आताची पोर सांभाळतील का आता आठवा...
कुठं गेल्या त्या लग्नाच्या पंगतीच्या पंगती ,
आता कार्यालयात चार बसती तर चार उठती
कुठं गेली ती वृक्षाची छाया ,
आता वृक्षतोड करणायांना नाही राहीली दयामया
कुठं गेला तो हदयाचा ओलावा
आता हदय कोरड ठणठणीत आत फक्त हवा
कुठ गेल ते खुषालीच पत्र
आता मोबाईलवर वेगळच दिसतय चित्र ....