गड
गड
शिवरायांच्या काळात
महत्त्व होते गडांना
म्हणूनच दूरदृष्टीने
त्यांनी हेरलेले त्यांना
एक एक गडासाठी
वेचला होता मोहरा
बाजीप्रभू,तानाजी परि
स्वामिनिष्ठ होता खरा
गडावर करता आले राज्य
म्हणूनच स्वराज्य मिळाले
गनिमीकावा खेळून सारे
मुघल राज्य लयाला नेले
इतक्या भक्कम गडांना
पण आज आलीय अवकळा
भिंतींची झालीय तोडमोड
आणि केरकचरा झालाय गोळा
सृष्टी सौंदर्य गडाचे
ठरलंय मातीमोल
म्हणूनच निसर्गसौंदर्याचा
ठळतोय तोल
चला साऱ्यांनी पण करू
गडाचे रक्षण करू
शिवबाच्या आठवणींना
चिरकाल जतन करू
