गैरसमज....
गैरसमज....


एक काळ निघुन जातो
लोकांना आपलासं करायला,
पण इवलासा क्षणच पुरेसा
होत्याचं नव्हतं व्हायला....
शब्दांनी जुळतात नाती घट्ट
पण एक शब्दच पुरेसा,
नात्यात फुट पाडण्या...
सगळंकाही साधं सोपं असतं
पण कुणालाही शक्य असुनही
उत्तर शोधायचं नसतं....
कारण असतो मनासोबत
विचारात पण पसरलेला
गैरसमज, गैरसमज आणि फक्त
गैरसमज.....